team jeevandeep 25/03/2025 sthanik-batmya Share
डोंबिवली :
कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून व्यंगात्मक टीका केल्याने शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत.डोंबिवलीत सोमवार 23 तारखेला डोंबिवलीतील इंदिरा चौकात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केले. कुमाल कामरा याने माफी मागावी नाहीतर त्याच्या चेहऱ्याला काळे फासू असे शिवसैनिक म्हणाले. शिवसेना कामरा विरोधात गुन्हा दाखल करणार आहोत असे यावेळी तालुकाप्रमुख महेश पाटील म्हणाले. आंदोलनात कामराच्या फोटोला काळे फासत घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी माजी नगरसेवक विश्वनाथ राणे,, रणजीत जोशी, संजय पावशे ,कविता गावंड, शीतल लोके, दिनेश शिवलकर, तेजस पाटील, दत्ता वझे, सुदाम जाधव यासह अनेक शिवसैनिक होते.