Visitors: 390958
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कासगाव हद्दीत तहानलेल्या हरीणीची पाण्यासाठी कोरड्या विहिरीत उडी, ! मात्र बाहेर पडण्याच्या प्रयत्नात दुर्दैवाने मृत्यू !

  team jeevandeep      19/04/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड दि.१९-(प्रतिनिधी)

मुरबाड तालुक्यातील डोईफोडी नदीलगत असलेल्या कासगाव हद्दीतील एका कोरड्याठाक विहिरीत तहानलेल्या साडेतीन वर्षांच्या हरीणीने ऊडी मारली परंतु विहीरीत पाण्याचा थेंबही नसल्याने त्या तहानेने व्याकूळ झालेल्या निरागस हरीणीने बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची  पराकाष्ठा केली,मात्र विहिरीच्या काठावर येऊन पुन्हा पुन्हा खाली पडल्याने एक पाय मोडला तसेच गंभीर जखमा झाल्या या बाबत दक्ष तरुणांनानी मोबाईल द्वारे सरळगाव येथील वनरक्षक दिगंबर शिंगोळे,वनपाल भांगरे, वनरक्षक लखन रहाटे, भानुदास देसले, अर्जुन फोडले,व अश्वमेध प्रतीष्टान , तसेच वन्यजीव रेस्कुटीमचे साईनाथ भवार,प्रवीण भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अथक परिश्रमाने हरीणीला विहीरी बाहेर काढले परंतु हरीण मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याने हरीण गतप्राण झाली.

या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने या मुक्या प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे अशी मागणी वन्य प्राणी प्रेमी कडुन होत आहे.

+