team jeevandeep 21/01/2025 sthanik-batmya Share
मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरेंच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी प्रकल्प की ज्यामुळे जागतिक पर्यटनाच्या क्षेत्रात मुरबाडचे नाव अधोरेखित होऊन तालुक्यातील पर्यटन आणि पर्यायाने रोजगार वाढिला चालना मिळेल असा माळशेज घाटातील बहुचर्चित काचेचा स्काय वॉक (Viewing Gallary) बांधण्याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली,पर्यटन मंत्री शंभुराज देसाई ,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक ,पर्यटन सचिव जयश्री भोज मॅडम, आमदार किसन कथोरे आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांची मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.
येत्या मार्च २०२५-२६ च्या बजेटमध्ये याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करून प्रशासकीय मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना सुचना देण्यात आल्यामुळे माळशेज घाटातील काचेचा स्काय वॉक बाबतच्या मुरबाड करांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.