Visitors: 237680
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कल्याणमध्ये भोंदू बाबाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार

  team jeevandeep      30/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण आंबिवली नजीक मोहने परिसरात बाबागिरी करणार्या भोंदू बाबाने  एका मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे पिडित मुलीच्या तक्रारीवरून उजेडात आला आहे.  

       मोहने येथील विठ्ठल वाडी परिसरात राहणाऱ्या बाबागिरी करणारा भोंदू बाबा अरविंद जाधव याने पिडीत मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीची अडचण सागंण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीस एका रुम मध्ये एकटे बसवित  विनयभंग केल्याची घटना घडली.  भोंदू बाबा याने त्या पिडीत मुलीस हा प्रकार कोणाला सांगितला तर, तुझ्या फँमली सोबत वाईट करेल अशी धमकी दिली. या प्रकरणी पिडित मुलीने खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असता खडकपाडा पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भोंदू बाबा अरविंद जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून घटने संदर्भात पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.    

+