team jeevandeep 20/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याणमध्ये तीन बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली असून कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी हि कारवाई केली आहे. परवीन शेख, खादीजा शेख, आणि रिमा सरदार अशी या बांग्लादेशी महिलांची नावे असून कल्याण स्टेशन परिसरातून त्यांना अटक केली आहे.
महात्मा फुले चौक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पिटा कायद्यांतर्गत काही महिलांना अटक करण्यात आली होती. यामध्ये 13 महिलांची यामधून सुटका करण्यात आली होती. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्फत तपास सुरू असतांना काही बांग्लादेशी महिला स्टेशन परिसरात येत असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने स्टेशन परिसरात कारवाई केली असता तीन बांग्लादेशी मिळून आल्या असून याबाबत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची पोलिस अधिकारी विकास मडके यांनी दिली.