Visitors: 240478
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कल्याण पूर्वेतील गणेशभक्त कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना

  Thane jeevandeep      07/09/2024      sthanik-batmya    Share


kalyan East Bus  (2) 

शिवसेनेच्या वतीने गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेची सुविधा

कल्याण : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे मोफत बस सोडण्यात आल्या असूकल्याण पूर्वेतील ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरून चाकरमानी गुरुवारी संध्याकाळी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाले.

या प्रवाशांना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शुभेच्छा दिल्या. तर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी भगवा झेंडा दाखवत रवाना केले. यावेळी शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक नीलेश शिंदे, कल्याण पूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे, रमाकांत देवळेकर, माजी नगरसेविका माधुरी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रभर एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अजुन सुद्धा काही एस.टी. चालक नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध राहिले, त्या बद्दल त्यांचे आभार मानले. कल्याण पूर्व शहरातील विविध मुख्य ठिकाणांहून या बसेस सोडण्यात आल्या. या सर्व गाड्यांना झेंडा दाखवून प्रवाशांना त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कल्याण पूर्व शहराकरिता बससेवेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल खा. डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना कल्याण पूर्व यांचे नागरिकांनी आभार मानले असल्याची माहिती कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली.

 

 

+