Visitors: 234449
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

कल्याण डोंबिवलीत नायलॉन मांजा विकणाऱ्या सहा जणांवर कारवाई

  team jeevandeep      13/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : मकर संक्रांतीचे औचित्य साधून पतंगबाजी करण्यात येते. मात्र हि पतंगबाजी करतांना नायलॉन मांजा वापरल्याने अनेकांना इजा होते, अपघात होऊन अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर याचा फटका सर्वात जास्त पक्षांना देखील बसत असून या नायलॉन मांज्यामुळे अनेक पक्षी देखील मृत्यूमुखी पडत असतात. त्यामुळे नायलॉनचा मांजा वापरण्यास शासनाने बंदी घातली असून तरी देखील हा नायलॉन मांजा बाजारपेठेत सर्रासपणे विकला जात आहे. अशा या नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांवर कल्याण पोलिसांनी कारवाई केली आहे.  

कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सुचनेनुसार कल्याण डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात नायलॉन मांजा बाबत कारवाई करण्यात आली. यामध्ये कोळशेवाडी पोलिसांनी 1, विष्णुनगर पोलिसांनी 1, खडकपाडा पोलिसांनी 2, बाजारपेठ पोलिसांनी 1, महात्मा फुले पोलिसांनी 1 अशा एकूण 6 केसेस करण्यात  आल्या  असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. 

 

+