team jeevandeep 31/03/2025 sthanik-batmya Share
दि.
कवी कथाकार सुधीर शेरे यांचा साहित्य वेल प्रकाशन, सातारा यांनी प्रकाशित केलेला 'ओव्या दिनांच्या' या कवितासंग्रहाचे दि. 31 मार्च रोजी बहुजन साहित्य संघ, चिखली. आयोजित सहावे बहुजन साहित संमेलन सिंदखेडराजा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.
या प्रसंगी संमेलनाध्यक्ष प्राचार्य बी. एन. चापे, किरण डोंगरदिवे, सिनेअभिनेत्री डॉ. रेणू जोशी,संपादक डी.एन. जाधव, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, डॉ. विजयकुमार कस्तुरे, डॉ. डी. व्ही.खरात, संपादक ज्ञानेश्वर बुधवत आदी मान्यवर उपस्थित होतो.
स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, जागतिक दिन विशेषांवर अधारित अष्टकक्षरी छंदातील ओव्या संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक,यांना प्रबोधनपर कविता ज्ञान, विज्ञान, कला, सेवा, आरोग्य, प्रदुषण, पर्यावरण, आदी विषयांवर मूल्य रुजवण करणा-या कवितासंग्रहाचे सर्वांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.