Visitors: 226586
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

ऑपरेशन सिंदूर विजयाने डोंबिवलीत शिवसेनेचा जल्लोष

  team jeevandeep      07/05/2025      sthanik-batmya    Share


डोंबिवली  :

पाक व्यक्त   काश्मीर मध्ये अतिरेकी स्थळावर भारतीय वायूसेने ऑपरेशन - सिंदूर  यशस्वी केले. भारतीयांना याचा अभिमान व आनंद असून अतिरेक्याना मारून टाका असे बोलत आहेत.बुधवार 7 तारखेला  डोंबिवलीत शिवसेनेकडून शहर शाखेसमोर फटाके वाजवत ढोल- तश्याच्या गजरात भारत सरकारचे कौतुक करत जल्लोष केला.यावेळी आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, दिनेश शिवलकर, शिवराम हळदणकर, 

माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, संजय पावशे, रणजित जोशी,सागर जेधे, तेजस पाटील, वैभव राणे,तुषार शिंदे,  कविता गावंड, रश्मी गव्हाणे यासंह शिवसैनिक उपस्थित होते.

  यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले, संपूर्ण जगाला माहित आहे की भारतातील जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये  पर्यटकांवर अतिरेक्यानी हल्ला करत  28 जणांना जीवे ठार मारून बहिणीने कुंकू पुसले.अतिरेकी हल्लात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने बळी गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता ते कुटुंबिय म्हणाले, अतिरेकयांवर हल्ला होईल, पाकिस्तानवर हल्ला करतील तेव्हा त्यांना श्रद्धांजली मिळेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गमिनी कावा प्रमाणे पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणावर एअर स्टाईक करून अतिरेक्याना ढगात पाठवले.आज शहीदांना श्रद्धांजली मिळाली.

  उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले, आता पाकिस्तानला आणि सर्व अतिरेक्याना मारण्याची वेळ आली आहे. भारतीय वायूसेने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवले. सर्व भारतीयांना याचा अभिमान आहे.

   कविता गांवड म्हणाल्या, पाकिस्तानने भारतवर छुपे हल्ले करणे बंद करा. बहिणीचे कुंकू पुसलं त्यांना भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर करून धडा शिकवला आहे.रश्मी गव्हाणे म्हणाल्या, या पाकिस्तानला जगाच्या नकाशातून मिटवले पाहिजे.

+