team jeevandeep 06/04/2025 sthanik-batmya Share
कल्याण :
एस.एस.टी. कॉलेजच्या खेळाडू राधा पांडे आणि गोल्डी पांडे यांची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा तामिळनाडूतील अलगप्पा विद्यापीठात होणार आहे.
या दोन्ही खेळाडूंची निवड त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर झाली असून, त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा विभाग आणि संपूर्ण महाविद्यालय परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांची निवड ही महाविद्यालयासाठी तसेच शहरासाठी अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत विद्यापीठांच्या संघांचा समावेश असून, राधा पांडे आणि गोल्डी पांडे या दोघी आपली चमकदार कामगिरी दाखवून महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.