Visitors: 229019
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

एमआयडीसी च्या पाणीपुरवठा योजनेतून खर्डी ला पाणी देण्यासाठी एमआयडीसीला साकडे

  team jeevandeep      25/03/2025      sthanik-batmya    Share


खर्डी, ता.25 :

  भातसा धरणाचच्या जलस्त्रोतातून  खर्डी एमआयडीसीला पाणीपुरवठा होणार आहे व सद्या ह्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून ह्या योजनेची पाईपलाईन खर्डीतून जात असल्याने  ह्या एमआयडीसी च्या पाणीपुरवठा योजनेतून खर्डी ग्रापला पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी खर्डीतील  उद्योजक गणेश राऊत यांनी नुकतीच एमआयडीसीच्या अभियंत्याची भेट घेऊन निवेदन दिले.खर्डी येथील दरवर्षी जाने पासून पाणीटंचाई सुरू होत असून येथील पाणीपुरवठा योजना तांत्रिक अडचणीमुळे वारंवार बंद पडत असते व त्यामुळे येथे एन उन्हाळ्यात कायमची पाणी टंचाई असते.ही पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी एमआयडीसीने  खर्डी ग्राप ला पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी खर्डीला एमआयडीसीने पाणीपुरवठा करावा यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून सकारात्मक चर्चा केली आहे.

    खर्डी ग्राप करिता 1980 ला जिप मार्फत भातसा धरणातुन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली पण ती योजना कालबाह्य झाल्याने व अनेक तांत्रिक अडचणीमुळे ही योजना बंद करून 2017 ला जिप मार्फत चांदा-खर्डी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे.सद्यस्थितीत ही योजना चालू-बंद स्थितीत असून वारंवार पाईप फुटणे,पंप बंद पडणे,वीज बिल न भरल्याने लाईट कट होणे यासारख्या अनेक तांत्रिक अडचणीमुळे ही योजनांची वारंवार बंद पडत असल्याने खर्डी ग्राप हद्दीत कायमस्वरूपी पाणी टंचाई असते.त्यामुळे येथील रहिवाशांना उन्हाळ्यात खाजगी बोअरवेल, टॅंकर व जार याचे पाणी अव्वाचे सव्वा पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ दरवर्षी येत आहे.

         खर्डी येथे एमआयडीसी मंजूर झाली असून त्याचा आराखडाही बनवायचे काम सुरू आहे परंतु येथे मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने एमआयडीसीने प्रथम पाण्याची सोय करायला घेतली असून त्याकरिता भातसा जलाशयातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.एमआयडीसीच्या  भातसा धरणाची पाईपलाईन खर्डी गावातूनच येत असल्याने ह्या योजनेचे पाणी खर्डी तील रहिवाशांना उपलब्ध करावे अशी मागणी एमआयडीसी चे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी उद्योजक गणेश राऊत,माजी सरपंच प्रशांत खर्डीकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पातकर, नरेश जाधव,शाकिर शेख, नितेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

+