Visitors: 391055
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

एकलव्य स्कूल प्रवेशासाठी कळमपाडा शाळेतील 5 विद्यार्थ्यांची निवड !

  team jeevandeep      05/04/2025      sthanik-batmya    Share


वासिंद (प्रतिनिधी)-

येथील जिल्हा परिषद कळमपाडा शाळेतील पाच विद्यार्थ्यांची एकलव्य स्कूल प्रवेशासाठी निवड झाली आहे. 

    राष्ट्रीय आदिवासी छात्र समिती मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 च्या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्याअंतर्गत 23 फेब्रुवारीला प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून  शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा कळमपाडा येथील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

    यामध्ये कपिल कोंडूराम हिंदोळा, भावेश अशोक बांगारा, निशार अरुण वाख, ऋतिक जैतू बांगारा व संस्कार अरुण बांगारा अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पहिल्याच प्रयत्नात या शाळेची या परीक्षेला प्रविष्ट झालेली सर्व मुले प्रवेशपात्र ठरल्याने मार्गदर्शक शिक्षक सुनील परटोले व मुख्याध्यापक प्रकाश झुगरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर  दरवर्षी या शाळेतील विद्यार्थ्यी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा यांसारख्या परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत येत असल्याचे शिक्षक सुनील परटोले यांनी म्हटले आहे. 

   दरम्यान, दुर्गम आदिवासी भागातील हुशार मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर या चार अपर आयुक्त कार्यक्षेत्रांमध्ये महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) मार्फत सीबीएसई बोर्डाच्या 37 एकलव्य निवासी शाळा चालवल्या जातात या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, गणवेश आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

+