Visitors: 226647
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

उल्हासनगरमध्ये तापमानाचा पारा वाढला

  team jeevandeep      06/05/2025      sthanik-batmya    Share


उल्हासनगर, प्रतिनिधी :

 सकाळी ढगाळ, दुपारी प्रखर ऊन, आणि संध्याकाळी परत थोडा गारवा असा उल्हासनगर शहरात सध्या हवामानाचा ‘हंगामी तमाशा’ सुरू असून, नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. ऊन आणि सावलीच्या लपाछपीत शहराची दिनचर्या कोलमडली आहे. बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत, लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग त्रासून गेले आहेत, आणि वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे त्रास अधिकच वाढत आहे. उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, सकाळी घरातून निघाल्यावर संध्याकाळीच घर गाठावं लागतंय !

मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने जवळपास ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, शहरात उन्हाचा चटका दिवसेंदिवस तीव्र होतो आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांची जीवनशैलीच बदलून गेली आहे. नागरिक दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना टॉवेल, टोपी आणि सनग्लासेसचा आधार घ्यावा लागत आहे. शहरातील काही भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरांतील पंखे, कुलर, एसी बंद पडतात आणि नागरिक अक्षरशः घामाघूम होतात. यामुळे वृद्ध, लहान मुले आणि रुग्णांवर विशेष परिणाम होत आहे.

उन्हाळा अजून काही आठवडे कायम राहणार असल्याने नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घेणे आणि प्रशासनाने तत्काळ सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सावली शोधणाऱ्या नागरिकांसाठी आता "सावली" ही देखील संसाधन वाटू लागली आहे. शहरातील वाढत्या तापमानाचा विचार करता उल्हासनगर महानगरपालिकेने तातडीने सावलीसाठी सार्वजनिक शेड्स, पाणपोया, आणि रस्त्यांवर थंड पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याशिवाय प्रमुख चौकात मेडिकल मदत केंद्रे उभारण्याचीही गरज आहे, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.

=====================

डिहायड्रेशनचा धोका – डॉक्टरांचा सल्ला

उष्णतेमुळे नागरिकांमध्ये डिहायड्रेशन, त्वचेची आग होणे, थकवा येणे आणि उष्माघाताच्या घटना वाढल्या आहेत. डॉक्टरांनी नागरिकांना उन्हात शक्यतो बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा, फळांचा रस, ताक, लिंबूपाणी यांचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हलक्या रंगाचे व अंग झाकणारे सुती कपडे वापरण्याचा आग्रह देखील करण्यात आला आहे.

+