Team jeevandeep 01/03/2025 sthanik-batmya Share
कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामे, 65 अनाधिकृत बिल्डिंग रेरा घोटळा या वादाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने रडारवर असलेली अनाधिकृत बांधकामे तोडक कारवाईचा धडका सुरु केला आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील मनपाच्या उद्यानाच्या आरक्षित भुखंडावर बांधलेली अनाधिकृत 5 मजली इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या कर्मचारी पथकाने शनिवारी सकाळी सूरू केली आहे. यामुळे आरक्षित भुखंडावर अनाधिकृत बांधकाम करणार्या भुमफियांचे धाबे दणाणले आहे. या तोडक कारवाईत, जेसीबी, डंपर आणि अनाधिकृत बांधकाम विरोधक कर्मचारी अनाधिकृत बांधकाम विरोधी पोलिस कर्मचारी असा मोठा फौजफाटा होता.
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त फ प्रभाग हेमा मुंबरकर यांनी या अनाधिकृत इमारती तोडक कारवाई निमित्ताने प्रसिद्धी माध्यांना सांगितले की, अनाधिकृत बांधकाम तोडक मोहीम, तसेच आरक्षित भुखंडावरील अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करीत अरक्षित भूखंड मोकळे करावेत असे आदेश केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिले असून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उप आयुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाबंळपाडा येथील आरक्षित भुखंडावर अनाधिकृत बांधलेल्या इमारतीचे पाडकाम सुरू केले आहे.
आरक्षित भूखंडावरील अनाधिकृत इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त झाल्यावर हा भूखंड मोकळा होईल. प्रशासनाच्या आरक्षित भूखंडावरील अनाधिकृत बांधकाम पाडकाम मोहीम मुळे आरक्षित भुखंडावर अनाधिकृत बांधकाम करणार्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.