team jeevandeep 27/12/2024 sthanik-batmya Share
कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात व्हि ए पत्रावले न्यायधीश यांच्यासमोर आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी त्यांना हजर केले असता आज सन्माननीय न्यायालयाने दोघा दाम्पत्यांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण पूर्व येथील नराधम आरोपी विशाल गवळी याला कल्याण न्यायालयातून ठाणे येथे नेण्यात आले असून आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिल कोळसेवाडी पोलिस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. आता पोलिस तपासात आणखी कोण कोणत्या गोष्टी समोर येतात हे पहावे लागेल.