team jeevandeep 11/02/2025 sthanik-batmya Share
शहापूर
भात खरेदी व बारदान घोटाळा ; अधिकाऱ्यांवर संशयाची सुई
मागील काही वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर उपप्रादेशिक कार्यालयात केल्या गेलेल्या भात खरेदीत शासनाच्या या धोरणांना तिलांजली दिली आहे.मागील तीन वर्षात व्यापारी,महामंडळाचे अधिकारी- कर्मचारी, सायबर केंद्रवाले आणि आदिवासी संस्थांचे सचिव या कंपूने भातखरेदी करताना करोडोंचा अपहार केला आणि शासनाची फसवणूक केली आहे.दरम्यान लाखो रुपयांच्या बारदान घोटाळ्यात उपप्रादेशिक अधिकारी सागर सोनावणे व प्रादेशिक अधिकारी यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अपर्णा खाडे यांनी शहापूर येथील शिवातीर्थावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भातील निवेदन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांना तहसीलदार परमेश्वर कासुले यांच्या मार्फत डॉ. खाडे यांनी दिले आहे.
भात खरेदी व बारदान वाटपात अधिकाऱ्यानीच नव्हे तर लोकप्रतिनिधींनी देखील लोकसेवक या नात्याने दखल घेणे क्रमप्राप्त आहे. शासनाने आधारभूत किंमत योजना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य वेळेत रास्त भाव मिळावा, त्याची व्यापाऱ्याकडून लूट होऊ नये याकरिता सुरु केली.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने या योजनेची अंमलबजावणी केली जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून आदिवासी महामंडळाच्या शहापूर उपप्रादेशिक कार्यालयात केल्या गेलेल्या भात खरेदीत शासनाच्या या धोरणांना तिलांजली दिली आहे. मागील तीन वर्षात व्यापारी, अधिकारी, महामंडळाचे कर्मचारी आणि आदिवासी संस्थांचे सचिव या चिंधी चोरांनी भातखरेदी करताना करोडोंचा अपहार केला आणि शासनाची फसवणूक केली आहे. जागरूक नागरिक आणि प्रसिद्धी माध्यमांनी यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी निर्भीड चौकशी करून गुन्हे नोंदवले परंतु सर्व प्रकरणात एखाद दुसरा आरोपी वगळता अनेकांना एक दोन वर्ष कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. हे सर्व आरोपी मोकाट फिरत असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली अद्याप का झाली नाही असा प्रश्न डॉ. खाडे यांनी उपस्थित केला आहे.सन २०१६/२०१७ या आर्थिक वर्षात मढ,अबर्जे आदिवासी संस्थेच्या प्रकरणातील आरोपीला सचिव यास पुन्हा खर्डी,पळशीन केंद्रावर नेमणूक देणाऱ्या अधिकाऱ्याची कसून चौकशी व्हावी. तसेच भात खरेदी करताना काही व्यापा-यांनी तलाठी आणि सायबर केंद्र संचालकांच्या मदतीने शेतकऱ्याऱ्यांचे बोगस सातबारे बनवले आहेत. तसेच सातबारा वरील विना लागावडी खालील क्षेत्र लागावडीच्या खोट्या नोंदी केल्या असल्याचे म्हटले आहे. अशा सर्व सात बाऱ्यांची चौकशी करून संबंधित व्यापारी, तलाठी आणि सायबरवाले यांच्यावर कारवाई करणे अनेक शेतकऱ्यांना महामंडळाने पावत्या दिलेले आहेत परंतु त्यांना अद्यापपर्यंत त्यांनी महामंडळात विकलेल्या भाताचा मोबदला मिळाला नाही. या सर्व प्रकरणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी डॉ. अपर्णा खाडे यांनी केली आहे.
#प्रतिक्रिया#
शासनाच्या भात खरेदी योजना शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना आहे.मात्र भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांनी या योजनेला गाळबोट लावले आहे.या भात खरेदीत व बारदानामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून काहींवर गुन्हे देखील दसखल झाले आहेत.तसेच बारादान घोटाळ्यात उपाप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनावणे तसेच प्रादेशिक व्यवस्थापक यांचा देखील हात असल्याने त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहीजे. डॉ. अपर्णा खाडे, सामाजिक कार्यकर्त्या.
#काय आहेत मागण्या#
बारदान घोटाळा प्रकरणी सर्व दोषीवर गुन्हे दाखल करणे, बारदान घोटाळा प्रकरणी अन्य केंद्रात आढळलेल्या तफावतीनुसार गुन्हे दाखल करणे, भात खरेदी घोटाळ्यातील आरोपीना अटक करून अपहार केलेल्या रकमेची वसुली करणे,अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर भात खरेदीच्या पावत्या देऊनही अद्याप मोबदला मिळाला नसल्याने त्याना मोबदला मिळावा,दहा-बारा वर्षापासून वापरण्यात आलेल्या खाजगी गोदामधारकांना भाडे मिळणेबाबत,अपहार करणाऱ्या व्यक्तींना वारंवार सेवेत घेतल्याप्रकरणी चौकशी होणे, मागील तीन वर्षातील भात खरेदी करताना वापरलेल्या सातबा-यांची चौकशी करून याप्रकरणी दोषी व्यापारी, शेतकरी, तुलाठी, सायबर चालक यांच्यावर गुन्हे दाखल करणे,भात खरेदी आणि बारदान घोटाळ्याचे फोरेन्सिक ऑडिट व्हावे,सहकारी सोसायट्याचे भात खरेदीचे कमिशन द्यावे व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी व्हावी.
@वडिलांची जयंती आणि मुलीचे आमरण उपोषण @
ठाणे जिल्ह्याचे भाग्यविधाते म्हणुन ओळख असलेले स्व. विठ्ठलदादा खाडे यांची ११ फेब्रुवारीला जयंती असते. तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी वडिलांच्या जयंतीदिनी डॉ. अपर्णा खाडे यांनी आमरण उपोषणाचे हत्त्यार उपसले आहे.दरम्यान तालुक्यातील रस्त्यांच्या भयाण अवस्थेबाबत प्रशासनाच्या विरोधात सहावेळा आंदोलन, भर पावसात रस्त्यांवरील खड्ड्यात बसून आंदोलन,बिगर आदिवासिंवर अन्याय केला जात असल्याने शासनाविरोधात मुंडन करुन केलेले आंदोलन, तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याने त्यांनी आरमाईट कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते.