Visitors: 229747
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

आजीबाई शाळा दशक पूर्ती सोहळ्याचे आयोजन ! आजीबाईंच्या जिद्दीचे होत आहे विशेष कौतुक !

  TEAM JEEVANDEEP      06/03/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड दि.६:

मुरबाड तालुक्यातील जगप्रसिद्ध आजीबाई शाळा फांगणे या शाळेची सुरुवात ८ मार्च २०१६साली कै.इंदुमती मोतीराम दलाल यांच्या शुभहस्ते फांगणे येथे झाली. त्यांच्या च प्रयत्नांतून फांगणे गावात घरोघरी नळ योजना राबविण्यात आली होती.कै.मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष  दिलीप भाई दलाल यांच्या माध्यमातून ही शाळा गेली दहा वर्षे आजीबाईंना ज्ञानदानाचे  पवित्र कार्य करत आहे.या आजीबाईंना शिकवण्याचे कार्य सौ. शितल प्रकाश मोरे करत आहेत तसेच शाळेसाठी स्वतःची जागा ही प्रकाश लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे . आजीबाई शाळेला आतापर्यंत २५ हून अधिक परदेशी नागरिकांनी भेट दिली असून अमेरिका , रशिया, जपान, जर्मनी, कॅनडा,फ्रान्स, स्वित्झर्लंड, बांगलादेश, इंग्लंड या देशातील पत्रकारांमळे जागतिक कीर्ती शाळेला प्राप्त झाली आहे.कौन बनेगा करोडपती, इंडियन आयडॉल,बरखा दत्त शो, आकाशवाणी, दूरदर्शन, विविध चॅनेल यांनी विशेष प्रसिध्दी दिली आहे आजीबाई शाळा दशक पूर्ती निमित्त विविध प्रकारचे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम  संपन्न होणार आहेत.स्नेह परिवार मुंबई टीमचे समाज सेवक अशोक वायकूल   प्रसिद्ध  दानशूर उद्योगपती रामकृष्ण कोलवणकर व त्यांचे सर्व सदस्य सहभागी होत आहेत महागणपती हास्पिटल टिटवाळा यांच्या तर्फे मोफत  आरोग्य तपासणी शिबिर व औषध उपचार केले जाणार आहेत    शाळेच्या यशात शिवतेज मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ फांगणे गावाचे खूप मोठे  योगदान असल्याचे लेखक  इतिहास संशोधक, शाळेचे व्यवस्थापक योगेंद्र बांगर यांनी  सांगितले 

  आजीबाईंचे कौतुक करण्यासाठी सर्वानी  या  दिमाखदार सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन  ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप  दलाल यांनी केले आहे

+