team jeevandeep 04/04/2025 sthanik-batmya Share
टिटवाळा :
वडील वै ह भ प श्री बाळू बांगो जाधव व आई वै ह भ प रखमाबाई बाळू जाधव यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन दत्त मंदिर हॉल फळेगाव टिटवाळा रोड येथे करण्यात आले होते या कामी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर -3 चे डॉक्टर वाघमारे व त्यांची टीम यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर पार पाडण्यात आले फळेगाव ग्रामस्थ नातेवाईक व मित्रपरिवार यांनी रक्तदान केले डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड चे आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन हा छोटासा उपक्रम आम्ही राबवला असे श्री काशिनाथ जाधव सर यांना विचारले असता त्यांनी सांगितले या सामाजिक उपक्रमासाठी कु भूषण मालू गायकर वाशिद कु अक्षय बालाराम बांगर रुन्दे श्री गोपीनाथ सुदाम भोईर उशिद श्री दीपक रामचंद्र घोडवींदे सारमाळ जितेंद्र बाळू जाधव खातिवली मार्तंड जमदरे, पुंडलिक कंटे, हवेश सुरोशे,मुरबाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या प्रसंगी श्री भगवान तारमळे, श्री रुपेश पितांबरे, श्री रमेश भोईर, आत्माराम तारमळे, उशीद श्री बलिराम झीप्पा जाधव, व दत्तात्रय बालू जाधव उपस्थित होते