Visitors: 239248
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणी ठाकरे गटाचा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा

  team jeevandeep      27/12/2024      sthanik-batmya    Share


अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणी ठाकरे गटाचा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी,

कल्याण  : कल्याण पूर्वेत एका तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरणात ठाकरे गट आक्रमक झाले असून आज ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी येथील शिवसेना  मध्यवर्ती शाखेपासून पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला.

 यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसरातील दारूचे अड्डे उध्वस्त करावे, शहरात फिरणाऱ्या नशेखोरांवरती कारवाई करावी त्याचबरोबर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावावे. नेहमी मुलींवरती अत्याचार करून मनोरुग्णाचे सर्टिफिकेट दाखवत न्यायालयातून सुटणाऱ्या आरोपींचे सर्टिफिकेटची चौकशी करावी. त्याचप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट दिलेल्या डॉक्टरांची देखील चौकशी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 

+