Visitors: 239260
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

अखेर त्या अल्पवयीन मुलीवर अंत्यसंस्कार

  team jeevandeep      27/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याणमध्ये अत्याचार करून हत्या केलेल्या अल्पवयीन मुलीवर अखेर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू दिले जाणार नाहीत अशी भूमिका घेत मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नागरिकांनी विरोध केला. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या समजूतीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कल्याणमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कल्याणमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपी विशाल गवळीला फासावर लटकवा किंवा त्याचा एन्काउंटर करा, अशा मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. आज अल्पवयीन मुलीचा मृतदेह मुलीच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, त्यानंतर कुटुंबीयांनी अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला. अंत्यविधीसाठी घरातून अंत्ययात्रा निघाली. मात्र अनेक ठिकाणी नागरिकांनी अंत्ययात्रा रोखून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुरू केली.

ठिकठिकाणी नागरिकांची समजूत काढल्यानंतर अंत्ययात्रा स्मशानभूमीत नेण्यात आली. यानंतर नागरिकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे बंद केले. मुख्यमंत्र्यांना इथे बोलवा, आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवे आणि आरोपींना फाशी द्या, तरच आम्ही अंत्यसंस्कार होऊ देऊ, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सर्वांना समजावून सांगितले की, या घटनेचे सर्व पुरावे आम्ही गोळा करू. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी पळून जाऊ नयेत, यासाठी प्रत्येक बाजूने तपास करू. पोलिस उपायुक्तांच्या समजूतीनंतर नागरिकांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला आणि त्यानंतर अंत्यसंस्कार  करण्यात आले. 

 

+