Visitors: 227017
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

सुनील म्हसकर यांच्या रिसर्च पेपरचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उत्कृष्ट सादरीकरण !

  team jeevandeep      07/05/2025      sthanik-batmya    Share


वासिंद ( प्रतिनिधी )-

संशोधन, अभ्यासक सुनील म्हसकर यांच्या रिसर्च पेपरचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उत्कृष्ट सादरीकरण झाले. 

      उल्हासनगर येथील सेवासदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) एक स्वायत्त संस्था असणाऱ्या तसेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (एनएएसी) द्वारे शिफारस करण्यात आलेल्या "अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष" (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सदन शिक्षण महाविद्यालय उल्हासनगर येथे 'कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षण, संधी आणि आव्हाने' या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (हायब्रिड मोड) आयोजित करण्यात आले होते. 

     या चर्चासत्राच्या प्रसंगी देशभरातून  विविध विद्यापीठ व शैक्षणिक व सामाजिक संस्थांमधून आलेल्या प्राध्यापक व संशोधन अभ्यासक तसेच  मुख्य विषयाशी संबंधित अनेक नाविन्यपूर्ण विषयांवरील संशोधन प्रबंध व शोध निबंध सादर केले. यामध्ये संशोधन अभ्यासक सुनील म्हसकर यांचा "माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची जाणीव आणि अध्ययन शैली यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास या विषयावरील पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केलेला रिसर्च पेपर उत्कृष्ट ठरल्याबाबत डॉ. पांडुरंग व्ही. बरकाले (सल्लागार, उच्च शिक्षण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा), महाराष्ट्र शासन, मुंबई) यांनी सुनील म्हसकर यांचे  विशेष कौतुक व अभिनंदन केले. 

      या चर्चासत्राच्या प्रसंगी तन्मय बलवा (संचालक शैक्षणिक, न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, सोनीपत), डॉ. अविनाश डांगवानी (सहयोगी प्राध्यापक, व्हीईएस पॉलिटेक्निक, मुंबई), डॉ. कला, (प्राचार्य, आरकेटी कॉलेज), डॉ. गुलाब चंद गुप्ता, (प्राचार्य, एसएससीओए), प्रा.देवेंद्रजी कोडवानी (उच्च शिक्षण अकादमीचे वरिष्ठ फेलो, कुलगुरूंचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय आणि पदव्युत्तर कार्यक्रम, द ओपन युनिव्हर्सिटी, यूके), डॉ. पांडुरंग व्ही. बरकाले (सल्लागार, उच्च शिक्षण राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा), महाराष्ट्र शासन, मुंबई), सेवासदन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रेणूका शेवकानी, सहयोगी प्राध्यापक डॉ.संजय निंबाळकर, सहयोगी प्राध्यापिका डॉ.हिना वाधवानी, डॉ.संध्या महाजन डॉ. राजकुमारी पंजाबी, डॉ. भक्ती जयसिंघानी, डॉ.रुक्मिणी जामदार, डॉ.मेरी वर्गीस, डॉ.राजश्री जोशी, डॉ.शीतल शिरोळ, डॉ.स्नेहा सामंत व ग्रंथपाल डॉ.अरुल पी. आदी मान्यवर आणि प्रा.सुनील म्हसकर प्रा. सुनील निंबियार, प्रा.सचिन पाटील, प्रा.अर्चना भालेवार असे अनेक संशोधन अभ्यासक आणि बीएड व डीएडचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

    यावेळी संशोधन अभ्यासक प्रा.सुनील निंबियार आणि प्रा.सुनील म्हसकर यांनी आपले मनोगत  व्यक्त केले.

सदर रिसर्च पेपरसाठी सुनील म्हसकर यांना मार्गदर्शक प्रा.डॉ.हिना वाधवानी, डॉ.भक्ती सिंघानिया, डॉ.संजय निंबाळकर (सहयोगी प्राध्यापक, सेवा सदन शिक्षण शास्त्र महाविद्यालय, उल्हासनगर) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर संशोधन अभ्यासक सुनील म्हसकर हे सध्या मुंबई विद्यापीठातून 'शिक्षणशास्त्र' या विषयात पीएचडी करत आहेत. ते राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्था पाली शहापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच शेतकरी उन्नती मंडळाच्या सिताराम रामा पाटील विद्यालय आणि रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय आमणे, तालुका भिवंडी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर या संस्थेचे अध्यक्ष राजू अनंत पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ दळवी वरिष्ठ शिक्षक सचिन पाटील व सर्व सहकारी व कुटुंबीय, मित्र परिवार सुनील म्हसकर यांस नेहमीच प्रोत्साहन देत असतात. सुनील म्हसकर यांनी  या आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर  व राष्ट्रीय पातळीवर अनेक रिसर्च पेपर उत्तम प्रकारे सादर केले आहेत. तसेच त्यांनी आजतागायत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, व वेबिनार यामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.

+