Visitors: 234493
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

सामाजिक कार्याच्या निधीसाठी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सादर करणार सांगीतिक कार्यक्रम "रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी"चे आयोजन

  team jeevandeep      27/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : सामाजिक कार्याच्या निधीसाठी गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन "रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी यांनी केले आहे. 31  जानेवारी रोजी रात्री ८ वाजता डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या गाण्याच्या एक आगळा वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आहेत.

"रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी" ही  रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ मधील महिला सदस्य असलेला एकमेव रोटरी क्लब आहे. क्लब तर्फे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने शहापूर, कसाऱ्या जवळील वनवासी पाड्यांवर अनेक प्रकल्प राबविले जातात. उदा. शालेय शिक्षणासाठी लागणारे E- Learning Set Up, विज्ञान लॅब, मुलींच्या शाळेत टॉयलेट बांधणे, सोलर लॅम्प्सचे वाटप, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम असो अथवा शेतकऱ्यांसाठी बी - बियाणे असोत. ह्याच बरोबर आपल्या विभागातील काही गरजू विद्यार्थी, महिलांना मदत करणे असे ही प्रकल्प राबविले जातात. महिला प्रकल्प अंतर्गत दरवर्षी ४५-५० स्टॉलस् असलेलं भव्य प्रदर्शन देखील आयोजित केल जात.

क्लबच्या उपक्रमांना आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी रात्री ८ वाजता डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या गाण्याच्या एक आगळा वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांनी हे दोन कलाकार डोंबिवलीत गायला येणार असल्याने परिसरातील संगीत रसिक सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतील अशी आशा क्लब च्या अध्यक्षा अर्चना कामोदकर यांनी व्यक्त केली.

+