Visitors: 391095
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

शिरवली काकडपाडा येथे  मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

  team jeevandeep      21/04/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड -प्रतिनिधी

 मुरबाड तालुक्यातील शिरवली काकडपाडा  येथे मानव सेवा सामाजिक संस्थे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मानव सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश बांगर यांनी हे मोफत आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आयोजित केले होते. यामध्ये रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टर पुनम डोंगरे , डॉक्टर ऋतुजा यादव , डॉक्टर अश्विनी जंगम व महागणपती हॉस्पिटल नर्सेस , स्टाफ यांनी सहभाग घेतला. 

गावचे पोलीस पाटील हर्षल घागस , दत्तात्रय म्हाडसे , लक्ष्मण घागस, धनाजी म्हाडसे व काकड पाडा शिरवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शिबिरासाठी उपस्थित होते.

+