Thane jeevandeep 18/02/2026 sthanik-batmya Share
आयुष्यभराच्या त्रासानंतर शेवटच्या विसाव्यातही'नरकयातना?

कल्याण(संजय कांबळे)ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा कुपोषणात आघाडीवर असून दुर्दैवाने ही या तालुक्याची ओळख बनत चालली आहे. शेकडो बालके कुपोषित असल्याने त्यांचे जीव टांगणीवर आहेत, दुसरीकडे अशीच परिस्थिती दुर्गम भागातील स्मशानभूमीची झाली असून भ्रष्ट व निकृष्ट कामामुळे या स्मशानभूमी चे केवळ सागांडे शिल्लक राहिल्याचे चित्र चक्क ग्रामपंचायत कार्यालया समोरच दिसून येत असून, ३२७पेक्षा जास्त आदिवासी गाव पाड्यात स्मशानभूमी नाहीत.त्यामुळे आयुष्यभर पोटाची खळगी भरण्यासाठी झगडणा-या आदिवासी, गोरगरीब, कष्टकरी लोकांना शेवटच्या क्षणी/विसाव्यात स्मशानभूमी अभावी नरकयातना भोगाव्या लागत आहेत, यामुळे या परिसरात समृद्धी, विकास, विकासपर्व, वेगवान सरकार गतिमान निर्णय असे'गोंडस, बाळसेदार, शब्द, ऐकायला, बघायला, मिळत नाही.
मुंबई शेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा दुर्गम आदिवासी तालुका असून११०ग्रामपंचायतीमध्ये२२७महसुली गावे५१४पाडे आहेत, येथे कुपोषणाची गंभीर समस्या आहे, एका अहवालानुसार सुमारे७००ते८००हून अधिक बालके कुपोषित असून त्यापैकी८०पेक्षा जास्त बालके तीव्र कुपोषित आहेत, ते मृत्यूशी झुंज देत आहेत. कुपोषणामुळे त्यांच्या शरीराचे सागांडे दिसत आहेत. येथील आदिवासी समाज पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे तिकडे स्थलांतरित होत असतात, आयुष्यभर रोजगार, आरोग्य, शिक्षण, पाणी यासाठी वनवन भटकावे लागत असते, रस्ते, दिवाबत्ती, गटारे, असे काही असते हे यांना माहिती नाही.
पण निदान शेवटच्या क्षणी स्वर्गाचा मार्ग सुकर व्हावा, मोक्ष मिळावा, वैकुंठ प्राप्त व्हावा, अशी माफक अपेक्षा यांची असते, परंतु तेही यांच्या नशिबी आहे असे वाटत नाही, कारण विसावा, शेवटचे ठिकाण असलेली मसणवाट, स्मशानभूमीत केवळ सांगाडे उरलेले आहे, तुटलेले, लटकलेले, सडलेले, पत्रे, चौथरा, खांबाभोवती उगलेले गवत, झाडेझुडपे, बैठक व्यवस्थेचा अभाव, उखडलेल्या लाद्या, सावली नाही, पाणी नाही, यामुळे पावसाळ्यात छत्री, प्लास्टिक मृतदेहावर धरून अंत्यसंस्कार करावे लागतात तर उन्हाळ्यात झाडं असतील तेथे बसून अखेरचा निरोप दिला जातो, अशीच स्थिती सध्या या तालुक्यात दिसून येत आहे,
शहापूर तालुक्यात३२७पेक्षा जास्त आदिवासी गाव पाड्यात स्मशानभूमि नाही,१९७स्मशानभूमी आरसीसी आहेत तर२३१सुस्थितीत आहेत.त्यामुळे वाटचुकलेला'विकास, कुठे भेटला तर आमच्या वाड्या वसत्यावर पाठवा असे आदिवासी तरुण सांगत आहेत