team jeevandeep 22/04/2025 sthanik-batmya Share
वासिंद (प्रतिनिधी )-
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या संघटनेच्या वतीने शहापूर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून जन सुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध करुन हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी
आज दि. 22 एप्रिल रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) या संघटनेच्या वतीने शहापूर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून जन सुरक्षा विधेयकाचा तीव्र निषेध करुन हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली.
सदरचा मोर्चा रखरखत्या उन्हात निघाला होता. बस स्थानकातून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचून यामध्ये सहभागी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी या विधेयकाला विरोध दर्शवून निषेध करीत रद्द करण्याचे मागणीचे निवेदन नायब तहसीलदार व्ही.आर. चौधरी यांच्याकडे दिले.
या मोर्चावेळी माकप जिल्हा सचिव मंडळ सदस्य व तालुका सचिव कॉ.कृष्णा भवर, एसएफआय जिल्हा अध्यक्ष कॉ.भास्कर म्हसे, सिटु राज्य कमिटी सदस्य व तालुका अध्यक्ष कॉ.विजय विशे, माकपचे सोनू वाघ, नंदू खांजोडे, रामदास कोदे, अशोक विशे, मनोज काकवा, मनीष फोडसे, आनंद रोज, बंडू खर्डीकर, अनु अंधेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेत मोर्चाला संबोधित केले.