Visitors: 229772
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने हॉटेल, बार मालक संघटनेसोबत आयुक्तांची बैठक पार पडली.….

  team jeevandeep      05/03/2025      sthanik-batmya    Share


मा. प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांनी पदभार स्विकारल्यानंतर शहरातील स्वच्छतेबाबत गांभीर्याने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 04.03.2025 रोजी शहरातील सर्व हॉटेल,बार, परमीट रुम मालक आणि त्यांच्या संघटनांसोबत बैठक पार पडली.

हॉटेल मधील कचरा, शिल्लक राहीलेले किंवा वाया गेलेले अन्न याचा कचरा दैनंदिन स्वरुपात हॉटेल बाहेर फेकण्यात येत असल्याचे आढळून आले. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त यांनी बैठक आयोजीत केली होती. यामध्ये शहर स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, त्याचप्रमाणे हॉटेल,बार, परमीट रुम मालक हे देखील शहराचे स्टेक होल्डर (भागधारक) असल्याने त्यांच्या परिसराची स्वच्छतेची जबाबदारी ही त्यांचीसुद्धा असणार आहे. सर्व हॉटेल, बार, परमीट रुम चालक/मालक यांनी त्यांचे गाळ्याच्याबाहेर ओला कचरा व सुका कचरा यासाठी मोठे डस्टबीन ठेवणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा त्यांनीच वर्गवारी करुन त्या डब्यांमध्ये टाकणे आवश्यक आहे. यापुढे सर्व आरोग्य निरीक्षकांनी दोन तीन वेळा अचानक भेटी देऊन कचरा वर्गीकरणासाठी डब्बे ठेवले आहेत की नाही, तसेच, कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे किंवा नाही याची पहाणी करावी. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी घंटा गाडीने कचरा गोळा केल्यावर पुन:श्च मधल्या कालावधीत जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. जसे मोठे लोखंडी डब्बे ठेवणे, व्यावसायीकांनी त्यामध्येच कचरा टाकणे इत्यादी आवश्यक आहे.

हॉटेल मालकांनीही मागणी केली आहे की, दररोज घंटागाडी उपलब्ध झाली पाहीजे. तसेच, स्वच्छतेबाबत हॉटेल मालक देखील आग्रही असतात मात्र अनेकवेळा नागरीक देखील हुज्जत घालत असल्याने त्यांचा नाईलाज होतो. यावर प्रशासक तथा आयुक्त महोदयांनी पर्याय दिला आहे की, अशा वेळी त्या त्या क्षेत्रातील आरोग्य निरीक्षकला कळविण्यात यावे. महानगरपालिकेकडून त्यांना सहकार्य केले जाईल. यापुढे ज्या क्षेत्रात सलग हॉटेल, खानावळ, बार असतील त्या क्षेत्राला नो वेस्ट झोन (No Waste Zone) म्हणून घोषीत केले जाईल. त्या ठिकाणी हॉटेल संघटनेच्या सहकार्याने सुशोभीकरण करण्यात येईल. तसचे, यापुढे सर्व व्यावसायीक आस्थापनांसाठी घंटागाडीच्या वेळा व मार्ग निश्चीत करुन दिवसातुन दोन वेळा कचरा गोळा केला जाईल, असे आयुक्तांनी नमुद केले.

या बैठकीस मा. अतिरीक्त आयुक्त श्री. देवीदास पवार, उपायुक्त (आरोग्य) श्री. शैलेश दोंदे, सहायक आयुक्त (आरोग्य) श्री. नितीन पाटील, आरोग्य विभागप्रमुख श्री. हरेष भंडारी, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी, कार्यालयीन अधिक्षक आरोग्य विभाग श्री. जे. एम. सोनावणे, हॉटेल, बार आणि परमीट मालक तसेच त्यांचे संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

(श्रीकांत परदेशी)

माहिती व जनसंपर्क अधिकारी

+