team jeevandeep 29/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.२९-
लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी,,हे ब्रिद घेऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या "व्हाॅईस ऑफ मिडिया,, या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संघटनेच्या मुरबाड तालुका कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा आज मुरबाड येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह म्हसारोड मुरबाड येथे संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष .मंगल डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे डिजिटल विंगचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष .बाळासाहेब भालेराव ,, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष .राजेश भांगे,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या सभेत मुरबाड तालुका अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार .श्यामभाऊ राऊत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष पदी पत्रकार दिलीप घुडे,व निलेश अहिरे, सरचिटणीस पदी -पद्माकर दळवी, चिटणीस पदी-जनशक्तीचे जिवन शिंदे, कोषाध्यक्ष म्हणून -संदिप पष्टे, तालुका संघटक -श्री.सुरेश भालेराव, प्रसिद्धी प्रमुख -योगेश तेलवणे , प्रवक्ते पदी-सुधाकर वाघ, कार्याध्यक्ष पदी -अरुण ठाकरे, कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड.किशोर गायकवाड, कार्यालयीन प्रमुख -शंकर आगिवले,तर कार्यकारिणी सदस्य म्हणून एस.एल.पाटील, नितेश डोंगरे,बाळा भांगे,गितेश पवार,, इत्यादी सदस्य उपस्थित होते.या सर्वांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने नवनियुक्त्या देण्यात आल्या.
यावेळी बाळासाहेब भालेराव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर जिल्हा अध्यक्ष श्री.मंगलजी डोंगरे यांनी संघटनेचे कामकाज कशा पद्धतीने चालवायचं, संघटनेची ध्येय उदिधिष्टे व कार्यप्रणाली बाबत माहिती देऊन, भविष्यात पत्रकार मित्रांसाठी संघटना कशा पद्धतीने उपक्रम राबवणार आहेत.याबाबत मार्गदर्शन केले.