team jeevandeep 01/02/2025 sthanik-batmya Share
कल्याण : वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्यां राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी मीटिंग घेऊन सोडवल्या मात्र प्रत्यक्षात काही गंभीर समस्यां सुटल्या नसून कंत्राटदार व अधिकारी यांच्या हितसंबंधा मुळे कष्टकरी कामगार अडचणीत असल्याचे संघटना प्रतिनिधी यांनी लक्षात आणून दिल्यामुळे लवकरच भारतीय मजदूर संघाच्या वीज कंत्राटी कामगार संघाची राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक लावणार असल्याचे आश्वासन माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडकर यांच्या घरी सुधीर मुनगंटीवार आले असता संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, रोहन पवार, विकास माने, पश्चिम महाराष्ट्र समरसता गतीविधीचे रवी ननावरे इत्यादी उपस्थित होते. उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकारी वर्गाने केली पाहिजे. शासन प्रशासना सोबत संवाद हवा संर्घष नको अशी अपेक्षा अध्यक्ष निलेश खरात यांनी व्यक्त केली.