team jeevandeep 29/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.२९-
मुरबाड तालुक्यात दिव्यांग जणांच्या प्रलंबित काही मागण्यांसंदर्भात २५ मार्च २०२५ रोजी दिव्यांग संस्थेच्या वतीने मुरबाड पंचायत समितीला पत्र देऊन दिव्यांग जणांनी आपली खंत शासकीय दरबारी मांडुन २८ मार्च पर्यंत आम्हाला आमच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी.असे सांगितले होते.मात्र तसे न झाल्याने आज अखेर त्यांनी झंकार आंदोलन सुरू केले.तेव्हा कुठे सरकारला जाग आली. आणि त्यांनी बातचीत केली.त्यात 5 टक्के दिव्यांग निधी १० एप्रिल पर्यंत वाटप करण्यात यावा.त्यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी यांना सुचेना देण्यात आली आहे.दिव्यांग जणांची नोंदवही अद्यावत ठेवणे.घरकुल योजना "ड,, यादीमध्ये पात्र दिव्यांगाना प्राधान्याने शासन निर्णयानुसार सर्व्हेक्षण करणे.घरपट्टी मध्ये ५० टक्के सवलत मिळावी.ग्रा.पं.स्व.उत्पनात दिव्यांग खर्चाचा तपशील ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्यात यावा.ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग समिती स्थापन करून दिव्यांग प्रतिनिधी नेमण्यात यावा.या सर्व सुचनांचे पालन करत सरकारने ग्रामपंचायत अधिकारी यांना सक्त सूचना दिल्याचे पत्र आंदोलन कार्यकर्त्यांना दिल्यामुळे अखेर दिव्यांगांनी आंदोलन मागे घेतले आहे.