team jeevandeep 02/04/2025 sthanik-batmya Share
विक्रमगड:
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मनोबल वाढवून कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विक्रमगड पोलीस ठाणे यांचे कडून बेस्ट पोलीस ऑफ द मंथ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांची कार्यक्षमता व कामकाजाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे . विक्रमगड पोलीस ठाणे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मनोबल वाढवून त्यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता विक्रमगड पोलीस ठाणे यांचे कडून बेस्ट पोलीस ऑफ द मंथ या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे .सदर उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कामकाजाचे निकष ठरवून देण्यात आलेले असून त्या निकषाप्रमाणे जे पोलिस अधिकारी व अंमलदार दैनंदिन कामकाज व्यवस्थित रित्या पार पाडतील अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची गुणांकन पद्धतीने निवड करून त्यांना बेस्ट पोलीस ऑफ द मंथ या सन्मानाने पुरस्कृत करण्यात येईल.
माहे फेब्रुवारी २०२५ या महिन्यात विक्रमगड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कामगिरीचा आढावा घेता पो. हवा. मुकुंद रडका भोगाडे यांनी सुमारे ११ महिन्यापासून फरार असलेल्या बंदी आरोपीचा अत्यंत शिताफिने शोध घेऊन त्यास पकडून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच म.पो.शि . बसंता छगन लोखंडे यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीएनएस या ऑनलाइन कार्यप्रणालीचे उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. नमूद दोन्ही पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या निकषाप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये बेस्ट पोलीस ऑफ द मंथ या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तसेच यापुढे देखील पोलीस ठाणे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दैनंदिन कामकाज व विशेष कामगिरी बाबत आढावा घेऊन त्यांची गुणांकन पद्धतीने निवड करून त्यांना बेस्ट पोलीस ऑफ द मंथ या सन्मानाने पुरस्कृत करण्यात येणार आहे .अशी माहिती विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी दिली.