team jeevandeep 21/02/2026 sthanik-batmya Share

खर्डी : जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्ताने दिनांक २० फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक माहुली किल्ला येथे स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
या उपक्रमात ५० स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या, कागद व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
NSS कार्यक्रम अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “इतिहास जपणे आणि पर्यावरण संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या उपक्रमामुळे किल्ल्याचा परिसर स्वच्छ झाला असून पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे.
या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल सोनावणे तसेच प्रा. मृणाल वाघमारे उपस्थित होते. सदर उपक्रम संस्थेचे अध्यक्ष मा.रविंद्र घोडविंदे सर यांच्या प्रेरणेने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलास कळकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.