team jeevandeep 03/04/2025 sthanik-batmya Share
ठाणे : प्रतिनिधी
इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा NMMS (National Means Cum Merit Scholarship) घेतली जाते. सदरची परीक्षा दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे राजा शिवाजी विद्यामंदिर, लोकमान्य नगर शाळेतील शेडगे राजवीर सचिन, राजपूत वैष्णवी प्रकाश, गोल्हे तन्मय लक्ष्मण, मलपे सार्थक मनेश, टकले प्रणाली राहुल, जाधव तनया भास्कर, चिर्लेकर सृष्टी शशिकांत, सावंत श्रीधर संतोष या 08 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.पास झालेले सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना 4 वर्षांसाठी ₹12,000 प्रमाणे प्रति वर्ष एकूण ₹48,000 तर इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. राजा शिवाजी विद्यामंदिरचे विद्यार्थी या संधीचे सोने करतात. आतापर्यंत शाळेतून एकूण 249 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. त्यामुळे सदरची शाळा प्रज्ञावंतांची शाळा बनतेय.
या शाळेतील शिक्षक मुलांची काळजी घेतात आणि NMMS आणि सरकारी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी अतिरिक्त वेळ देतात अशा समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचे तसेच शालेय समिती अध्यक्ष घाडगे सर, मुख्याध्यापक थोरात सर, पर्यवेक्षक माने सर, यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक यांचे शाळा व संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.