team jeevandeep 29/04/2025 sthanik-batmya Share
डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर मधील सुभाष डेअरीच्या पुढील रस्त्यावर एक खड्डा खणण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून हा खड्डा तसाच असून प्रशासनाच्या दुर्लक्षित कामकाजामुळे हा खड्डा भरण्यात आला नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी यावर आवाज उठवला आहे.प्रशासनाने येथील रस्त्यावरील खड्डा बुजविला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील ट्रान्सफॉर्मरजवळील रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डा असून तो का खणण्यात आला आहे असा येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे. सायंकाळी अथवा रात्रीच्या वेळी या खड्यात पडून वाहनचालक जखमी होण्याची शक्यता येत नाही. मनविसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी याबाबत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.दोन दिवसात हा खड्डा बुजविला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
चौकट
येथील खड्डा बुजविण्यास पालिका प्रशासनाला विसर पडला आहे. येथील खड्यात पडून वाहनचालक जखमी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या खड्यात पडून कोणी जखमी होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी खड्यात एक लाकडी बांबू उभा केला आहे.लाकडी बांबू पाहून वाहनचालक सावध होतील व त्यांची वाहने येथील खड्ड्यात पडणार नाही असे नागरिकांनी सांगितले.