Team jeevandeep 26/05/2025 sthanik-batmya Share
आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न!
कल्याण : कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी आणि म्हारळ गावाच्या समोर हायप्रोफाईल म्हणून ओळखले जाणाऱ्या रिजन्सी इमारतीच्या वर्कशॉप ला आज सकाळी आग लागली, ही इतकी पसरली कि आकाशात धुराचे लोट दिसत आहे, यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते, तर आग विझवण्यासाठी केडिएमसी, उल्हासनगर पालिका आणि सेंच्युरी कंपनीचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
म्हारळ गावा समोर शेकडो एकर भूखंडावर रिजन्सी बिल्डर ने गगनचुंबी इमारती बांधल्या आहेत, अनेक इमारती मध्ये लोक राह्याला देखील आले आहेत, सगळे नियम धाब्यावर बसवून हे बांधकाम सुरू आहे, या बाबतीत विधानसभेत अनेक वेळा खडाजंगी उडाली होती. परंतु सत्ता आणि पैसा यामुळे हे सगळे प्रकरण थंड झाले आहे.या परिसरात अनेक इमारतीचे काम अजून सुरू आहे, अशाच एका इमारतीच्या बाजूला असलेल्या वर्कशॉप मध्ये फायबर चे सिट असलेल्या भागाला सकाळी९:३०ते १०च्या दरम्यान आग लागली, आतमध्ये केमिकल असण्याच्या शक्यतेने आग भयानक पसरली, धुराचे लोट गगनचुंबी इमारतीना झाकून आकाशात जात होते, अगदी आजुबाजुला असलेल्या, म्हारळ, वरप, धोबीघाट, बिर्लागेट या परिसरातून हे लोट दिसत होते,
आग विझविण्यासाठी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, सेंच्युरी कंपनी यांच्या६ते ८गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, म्हारळ पोलीस चौकीचे पोलिस, व म्हारळ गावचे पोलीस पाटील दिनेश देशमुख हे घटनास्थळी धाव घेऊन मदत करत होते, सध्या आग आटोक्यात येत असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
, येथे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले काम यामुळे परिसरातील म्हारळ, वरप, कांबा या गावांना याचा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.