Visitors: 389843
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मृत्यूचे यमदूत

  team jeevandeep      24/02/2026      sthanik-batmya    Share




टिटवाळा :  टिटवाळा पूर्वेकडील थारवाणी परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घंटा वाजली आहे. रुंदा रोड, जावईपाडा येथील उतरणीवर आज एक मोठा ट्रक पलटी झाला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भरधाव ट्रक ट्रेलरने अनेक वाहनांना चिरडल्याची घटना अजून ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीती व्यक्त होत आह

या धोकादायक उतरणीवर जड वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे वारंवार दिसून येत आहे. प्रशासनाने आणि वाहतूक विभागाने केवळ अपघातानंतर धावपळ न करता, कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. वेगमर्यादेचे काटेकोर पालन, वाहतूक बीट पोलिस बंदोबस्त, स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि सीसीटीव्ही देखरेख यांची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई झाली नाही, तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नाकारता येणार नाही. आता तरी प्रशासन जागे होणार का?

+