Visitors: 232244
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मुरबाड ,शहापूर, कल्याण, भिवंडी येथील १०० गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप !

  team jeevandeep      02/03/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड :

दि१:  १ मार्च  २०२५ शहापूर तालुक्यातील दहागाव वाशिंद, , जिल्हा ठाणे येथे स्टँडर्ड चार्टर्ड बँक, मुंबई विभाग, बँकेच्या वतीने जिज्ञेश सामाजिक विकास संस्था शहापूर यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड व  कल्याण येथील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.

  शैक्षणिक उपक्रमांसाठी, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जुझार टिनवाला आणि मुंबई विभाग स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची टीम अनुराधा भाटिया,

 अमोल चौगुले, के पार्थसारथी,

 अमित सिंग व बँकेचे कर्मचारी वर्ग यांनी  ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड  कल्याण व भिवंडी परिसरातील गरजू मुलांना १०० लॅपटॉपचे वाटप केले आहे.   

हा उपक्रम दहावी, बारावी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला.  जिज्ञेश सामाजिक विकास संस्था शहापूर, यांच्या  वतीने संचालक ॲडव्होकेट दिनेश  हरड, संचालक शरद डोंगरे, मनिष भालेराव, यशवंत गायकवाड,संतोष परदेशी, संजय दामोदर व ग्रामस्थ यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सर्व टीमचे आभार मानले आहेत.

+