Visitors: 391642
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मुरबाड वरून शहापूरच्या दिशेने निघालेल्या बसचा मुरबाड कुडवली येथील आयटीआय जवळ अपघात..!

  team jeevandeep      19/03/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड -प्रतिनिधी

मुरबाडवरून शहापूरच्या दिशेने निघालेल्या महामंडळ बसचा मुरबाड कुडवली येथील आयटीआय जवळ अपघात झाला आहे.हया अपघातात सुमारे चालक कंडक्टरसह 18 प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर मुरबाड ग्रामीण रूग्णालय येथे डॉ.संग्राम डांगे ,डॉ.विश्‍वकर्मा ,डॉ.स्वप्नील वाकचौरे ,डॉ.सुतार व येथील कर्मचारी हरडभाऊ ,तानाजीभाऊ भाईर ,संदीप पष्टे व इतर कर्मचारी डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत. 

  सदरील घटना बस ड्रायव्हारने सांगितले की बसची स्टेअरींग ऑटोमेटीक लॉक झाली व बस पलटी झाली.आम्ही गेल्या आठवडयात मुरबाड बस आगाराबाबत वृत्त प्रसिध्द केल्या होत्या की आगारातील बस हे कमकुवत असून त्या नेहमी रस्त्यावर बंद अवस्थेत दिसून येतात कधी अनूसुचित प्रकार घडू नये यासाठी सरकारने याकडे लक्ष घालावे असे वृत्त प्रसिध्द होत असतात मात्र सरकारला वेळ मिळत नाही हे या घटनेतुन दिसून येत आहे.सदरील मुरबाड बस आगाराला 15 ते 20 एसी बस नवीन येणार असे घोषणा झाली होती मात्र हया बस कुठे गायब झाल्या हे मात्र गुलदस्त्यात आहे.

+