team jeevandeep 02/05/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.१ :
महाराष्ट्र पोलीस दलातील ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील मुरबाड पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संदीप गीते यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी प्रतिष्ठित पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.
त्यांच्या कर्तव्यदक्षता, आणि उत्कृष्ट कार्यामुळे पोलीस दलाची मान उंचावली आहे. महाराष्ट्र दिन१ मे, २०२५ रोजी ठाणे येथे आयोजित विशेष समारंभात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ .डी. एस. स्वामी यांच्या शुभहस्ते हे पदक प्रदान करण्यात आले.
पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाणे कार्यरत असताना खून दरोडा, जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणे, तसेच महत्त्वाच्या गंभीर गुन्हे मधील सराईत आरोपींना पकडणे कायदा व सुव्यवस्था राखणे करिता मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.