team jeevandeep 06/05/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.६-
मुरबाड नगरपंचायत हद्दीमध्ये मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने शहरातील मुख्य नाले व अंतर्गत नाले यांची साफसफाईचे कामे सुरू करण्यात आली आहेत. मुरबाड शहरात एकूण २ मुख्य नाले असून म्हसा रोड नाल्याच्या साफसफाईचे काम प्रगती पथावर आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता मुरबाड शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात येईल तसेच मुरबाड नगरपंचायत आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने उचित उपाय योजना राबविण्यात येत आहे. अशी माहिती मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी दिली आहे.
प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक १७ मध्ये नाल्यांची मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे केली जाणार आहेत त्यासाठी जेसीबी मशीन द्वारे नालेसफाईची कामे सध्या सुरू करण्यात आली आहेत.