Visitors: 390715
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मुरबाड तहसिल कार्यालयात आमदार किसन कथोरेंच्या हस्ते ध्वजारोहण!

  Team jeevandeep      01/05/2025      sthanik-batmya    Share


मुरबाडचे नाव जगाच्या नकाशावर झळकणार !

WhatsApp Image 2025-05-01 at 1-02-56 PM (1) 

मुरबाड : 1 मे महाराष्ट्र दिन म्हणजेच कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. मुरबाड तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात दरवर्षी प्रमाणे आमदार कथोरेंच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.यावेळी मुरबाड पोलीसांच्या वतीने झेंड्याला मान वंदना देण्यात आली. तदनंतर  मुरबाड तहसिलदार यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महसूल विभागातील सेवा निवृत्त कर्मचारी तातू ठाकरे यांचाही विशेष सन्मान कथोरेंच्या हस्ते करण्यात आला.

  यावेळी आमदार कथोरे यांनी मार्गदर्शन करताना विकासाच्या अनेक मुद्दयांना स्पर्श केला. आजच्या दिवशी मुरबाड शहरासह तालुक्यातील सर्व कामगारांची नोंदणी करण्याचे महत्वाचे काम करण्याचे आवाहन कामगार दिनी केले असून त्याचा लाभ कामगारांना मिळणार आहे. याजबरोबर माळशेज घाटातील बहुचर्चित काचेचा स्काय वॉकला वित्त विभागाची मंजुरी मिळाली असल्याने मुरबाडचे नाव जगाच्या पटलावर झळकणार आहे. समृद्धी महामार्ग, वडोदरा एक्सप्रेस,कल्याण -मालशेज हायवे यांच्यामुळे मुरबाडचे दळणवळण वाढणार असून भविष्यात तरूणांच्या हाताला काम देण्यासाठी नविन एम.आय.डी.सी.लवकरच आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.

या ध्वजारोहणासाठी तहसीलदार अभिजीत देशमुख, मुख्याधिकारी मनोज म्हसे,यांच्या सह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शालेय विद्यार्थी,महसूल चे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  तर मुरबाड शहरातील सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. मुरबाड नगरपंचायत कार्यालया समोर मुरबाड नगरपंचायत च्या वतीने सकाळी 7.वा.ध्वज फडकविण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

+