team jeevandeep 08/05/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.७ :
मुरबाड ग्रामीण भागात मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस वाऱ्याचा फटका बसल्याने यामध्ये तालुक्यातील करवेळे, वैखारे,कोलठण,शिवळे,वनोटे येथील २५ते३० घरावरील पत्र /कौले उडून नुकसान झाले आहे. तसेच मासळे येथील जिल्हा परिषद शाळेवर झाड पडून शाळेचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुरबाड तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तलाठी, सर्कल मंडळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून ज्या ज्या घरांचे अशंत नुकसान झाले आहे त्या त्या घरांचे तात्काळ पचनामे करण्यात आल्याची माहिती मुरबाड तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.सदरचा प्राथमिक अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे.
यापूर्वी १३ एप्रिल २०२५रोजी अककाली पावसाचा मुरबाड ग्रामीण भागात वादली वाऱ्यास पावसाचा जोरदार फटका बसला होता त्यामध्ये जवळपास ४५ घरावरील पत्रे/कौले उडून नुकसान झाले होते त्यानंतर मंगळवार ६मे २०२५ रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊसचा फटका बसल्याने त्यामध्ये २५/ ३० घरांवरील पत्रे/कौले उडून नुकसान झाल्याचा हा तालुक्यात दुसऱ्यांदा फटका बसला आहे.तसेच गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तसेच हवेतील गारवा जाणवला.