Visitors: 391724
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मुरबाडची शामली जाधव भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट.....

  team jeevandeep      08/03/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड-प्रतिनिधी : 

मन के जिते जीत है, मन के हारे हार! हार गये जो बिन लढे,उन पर है धिक्कार ! या पंक्तिला तंतोतत धरून एक अतिशय धाडसी कामगिरी करत मुरबाड तालुक्याची रणरागिणी कु.शामली विजय जाधव हिने भारतीय सैन्यदलात भरती होऊन खडतर अशी ट्रेनिंग पुर्ण करून ती लवकरच मायभूमी मुरबाड मध्ये येत आहे.लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेली शामली स्वतः उच्च शिक्षित पदवीधर असून खाजगी क्षेत्रात कुठेही तिला लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली असती परंतु देशसेवेची आवड मनात होती आणी ती सैन्यात भरती झाली. ट्रेनिंग साठी  बिहार राज्यात असताना तेथिल खडतर अशी ट्रेनिंग तिने यशस्वी रित्या पुर्ण केली आहे.त्यामुळे गया येथे 6 व 8 मार्च 2025 रोजी होणाऱ्या पासिंग आऊट परेड मध्ये शामलीच्या कुटुंबाला सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले आहे.समस्त मुरबाडकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असून तिचे जाधव कुटूंब हा सुखद व अभिमानाचा क्षण पाहण्यासाठी बिहार मधिल गया येथे गेले आहेत.

शामलीने केलेल्या कामगिरीचे निश्चितच ठाणे जिल्हासह मुरबाड तालुक्यात जोरदार कौतुक व अभिनंदन होत असून तिने  जागतिक महिला दिना निमित्त  तरूण ,तरूणींना मोठी प्रेरणा व स्फूर्ती दिली आहे.

+