महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फटाके मुक्त दिवाळी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फटाके मुक्त दिवाळी
Thane jeevandeep
20/10/2025
sthanik-batmya
Share
कल्याण : ठाणे जिल्ह्यामध्ये फटाके मुक्त दिवाळी अभियान हा पर्यावरण पूरक जागृती पर कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,ठाणे जिल्हा तर्फे ठिकठिकाणी राबवण्यात आला. कल्याण येथे डॉ.सुषमा बसवंत,कार्याध्यक्ष,जिल्हा ठाणे यांनी शशांक माध्यमिक विद्यालय, कल्याण मध्ये मुलांना फटाके विरहित दिवाळी करण्यासाठी प्रतिज्ञा दिली आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, झाडांची होणारी कत्तल, बालकामकारांची पिळवणूक या बाबी सांगितल्या. दीपावली नव्हे तर सर्व धर्मीयांच्या उत्सवामध्ये,लग्नामध्ये,मिरवणुका मध्ये फटाके फोडणे हे किती घातक आहे ते सांगितले. चंद्रलेखा गायकवाड व वैशाली पाटील यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. कल्याण शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दिवा येथे एस एम जी विद्यालय मधील मुलांना साधना भेरे यांनी फटाके मुक्त दीपावली अभियानची माहिती दिली आणि फटाके मुक्त दीपावली करण्याची प्रतिज्ञा मुलांनी केली. शहापूर शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.पी एन गुडे विद्यालय,भादाने इथे प्रियांका सवाखंडे यांनी फटाके मुक्त दिवाळी हा कार्यक्रम सातवी ते दहावीच्या मुलांच्यासाठी राबवला. मुख्याध्यापक गोडांबे यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम मुरबाड शाखेने आयोजित केला होता.215 विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्ह्यात या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
सध्या इको फ्रेंडली फटाके ही नवीन टुम आलेली आहे. परंतु त्यामुळे पण ध्वनी प्रदूषण,हवा प्रदूषण होतेच होते आणि ती फक्त लोकांना भुलवण्याची पळवाट आहे,हे जागरूक नागरिकांनी लक्षात घ्यावे असे डॉ. सुषमा बसवंत यांनी सांगितले.