team jeevandeep 26/03/2025 sthanik-batmya Share
जॉ्यंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाउन आयोजित जॉइंट्स मणिकर्णिका अवॉर्ड 2025, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन्माननीय महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौं. वीणाताई गणेश जाधव यांना जॉ्यंट्स ग्रुप ऑफ कल्याण यांस कडून सन्मानपूर्वक श्री.मनोहरजी पालनसर, श्री. नरेशचंद्र सर (संचालक बिर्ला कॉलेज) श्री. प्रशांतजी भागवत साहेब (कार्यकारी अभियंता कल्याण डोंबिवली महानगरपालिका) डॉक्टर श्री. किशोर देसाई, श्री.संजय गुप्ता(रस्तोगी )प्रेसिडेंट जायंट्स ग्रुप मिडटाउन व सौं. उर्वशी गुप्ता (रस्तोगी) प्रेसिडेंट जॉयंट सहेली मिडटाउन यांच्या शुभहस्ते देण्यात आला, सभापती व नगरसेविका असताना आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य --- त्यातील प्रमुख कामे राणी लक्ष्मीबाई उद्यानाचे सुशोभीकरण करणे, अत्याधुनिक व सुसज्ज असे आकांक्षी शौचालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व बहुउद्देशीय केंद्र त्यात कॅरम, बुद्धिबळ, संगणक, वाचनालय विविध लेखकांची व कवींची पुस्तके, ओपन जिम,अपंगाना पेन्शन, रामबाग मधील बहुतांश रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, मेन लेन सह,लेन नंबर चार, लेन नंबर पाच, लेन नंबर सहा व कर्णिक रोडचा काही भाग, मुरबाड रोड संतोषी माता रोड यासारखे असून, रामबाग मधील जेष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज असे रामबाग जेष्ठ नागरिक केंद्र त्यातच मुलांसाठी वातानुकूलित अभ्यासिका ज्येष्ठांसाठी वाचनालय तसेच प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवा देणारा आपला दवाखाना यासारखे भरीव कार्य त्यांनी केले आहे, त्यांच्या या संपूर्ण कार्याचा उल्लेख करून त्यांना यावर्षीचा जॉयंट्स मणिकर्णिका 2025 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.