team jeevandeep 24/04/2025 sthanik-batmya Share
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध संघटना संस्था असोसिएशन, आस्थापना यांची बैठक दिनांक १३/०३/२०२५ व ०८/०४/२०२५ रोजी गुंतवणुकीस प्रोत्साहन या मा. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा अंतर्गत मा. प्रशासक तथा आयुक्त सो., श्री अनमोल सागर (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती.
संदर्भीय घटका अंतर्गत दिनांक १७/०४/२०२५ रोजी लॉजिस्टिक असोसिएशन सदस्यांसाठी विशेष बैठकीचे आयोजन मा. प्रशासक तथा आयुक्त सो.. यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. सदर बैठकीस शहरातील एकूण १६ सदस्य यांनी आपली उपस्थिती दर्शवली. बैठकी दरम्यान मा. प्रशासक तथा आयुक्त सो., यांनी सर्व सदस्यांना आवाहन केले की, भिवंडी हे लॉजिस्टिक हैंव असून त्याची ओळख जागतिक पातळीवर होण्यासाठी अजून आपल्याला त्याच्यात काय सुधारणा करता येतील याबाबतीत असोसिएशनच्या लेटर हेडवर लिखित स्वरूपात सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले व विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.