team jeevandeep 28/04/2025 sthanik-batmya Share
ठाणे : प्रतिनिधी
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मान्यता त्वरित द्या - आमदार निरंजन डावखरे
भाजपा शिक्षक आघाडीची सहविचार सभा संपन्न
भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांच्या वतीने कोकण विभाग पदवीधर आमदार निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांच्या विविध समस्या संदर्भात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांच्या व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली. शिक्षक आणि शिक्षकेतरांची प्रलंबित सर्व कामे ही लवकरात लवकर मार्गी लावण्या संदर्भात निरंजनजी डावखरे यांनी आग्रही भूमिका मांडली. प्रदेश सहसंयोजक विकासजी पाटील आणि कोकण विभाग संयोजक किशोर पाटील यांनी शिक्षकांच्या विविध समस्या मांडल्या. यावेळी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, अधीक्षक संजय राऊत तसेच वरिष्ठ लिपीक नगराळे यांनीही समस्या समजून घेतल्या.
विविध शाळेतील प्रलंबित मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक मान्यता 4 मार्च पर्यंत देण्यात यावेत. सातत्याने सह्यांचे अधिकार देऊन सेवा जेष्ठ शिक्षकाला पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात येत असल्यामुळे सह्याचा अधिकार फक्त जास्तीत जास्त सहा महिन्यासाठी देऊन रिक्त पदावर त्वरित सेवा जेष्ठतेनुसार सेवाजेष्ठ शिक्षकास पदोन्नतीने नियुक्ती देण्यात यावी अशा प्रकारचे आदेश संस्थाचालकांना देण्यात यावे व तसे पत्र काढावे. तसेच सेवाज्येष्ठता संदर्भातील शासन परिपत्रक 28.01.2025 ची अंमलबजावणी तातडीने करावी. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ताडीने समायोजन करण्यात यावे. रात्र शाळेतील अतिरिक्त अर्धवेळ शिपाई यांना 17 मे,2017 नुसार पुर्णवेळ करणे किंवा प्रयोगशाळा सहायक पदाच्या पदोन्नतीस मान्यता देणे. प्रलंबित शालार्थ आय डी प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. बहुप्रतीक्षित पुरवणी बील व मेडिकल बील तात्काळ अदा करणे. ज्याचे पेंडिंग असतील ते त्वरित दिले जावे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्तावास मान्यता दिनांक पाच मे पर्यंत देण्यात यावे. अनुकंपा तत्वावरील नियुक्त कर्मचाऱ्यांना मान्यता ज्या बाकी असतील त्या लवकर दिल्या जाव्यात.कला शिक्षकांना ए. एम वेतन श्रेणी देताना शाळेची एक बी. एड ची जागा जाते हा भ्रम चुकीचा असून कला व क्रीडा शिक्षक हे स्पेशल शिक्षक असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार वेतन्नोती देण्यात येते ती आपण विनाअट द्यावी या विषयी चर्चा झाली. शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाईल असे यावेळी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी आश्र्वासित केले.
सभेचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपा शिक्षक आघाडीचे कोकण विभाग सहसंयोजक विनोद शेलकर यांनी केले यावेळी... अधिक्षक संजय राऊत, वरिष्ठ लिपिक नितीन नगराळे, वरिष्ठ लिपिक प्रशांत कसबे, भाजप शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक किशोर पाटील, कोकण विभाग सहसंयोजक विनोद शेलकर, ठाणे शहर संयोजक प्रा. संभाजी शेळके, भिवंडी विधानसभा सहसंयोजक ज्ञानेश्वर घुगे, जनरल एजुकेशन संचालक राजपूत सर इ . यांच्यासह समस्याग्रस्थ शिक्षक , शिक्षेकेतर कर्मचारी व मावळी मंडळ पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.