Visitors: 234453
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

बिर्ला कॉलेज, खडकपाडा, वायलेनगर, बारावे प्रभागातील महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप कार्यक्रम संपन्न

  team jeevandeep      04/02/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : भारतीय जनता पार्टी प्रभाग 2 ॲड. डॉ राजु राम यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालय, डॉ राजु राम & ॲड. शिल्पा राम फॉउंडेशन, वे ट्रू लाईफ सामाजिक संस्था, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बिर्ला कॉलेज, खडकपाडा, वायलेनगर, बारावे प्रभागातील महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उदघाट्न उपस्थित प्रमुख पाहुणे जेष्ठ संघ स्वयंसेवक आत्माराम  जोशी, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष, माजी गटनेते वरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाबा जोशी म्हणाले डॉ राजु राम व शिल्पा राम दांम्पत्य यांना मी गेली दहा वर्षांपासून ओळखतो ते गरीब गरजू, अनाथ, विधवा महिलां मुले यांच्या उन्नतीसाठी अनेक सामाजिक उपक्रम विविध प्रकारे करत असतात. या कार्या द्वारे समाज घडविण्याचे लोकहितार्थ कामे ते करतांना मी स्वतः पाहिले आहे. सर्वांनी सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी राम दांम्पत्य यांच्या कडून समाजकार्य शिकण्याची गरज आहे. या कौशल्य प्रशिक्षण केंद्रा द्वारे अनेक महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.

तसेच यावेळी भाजपा नेते मा.आमदार नरेंद्र पवार व शहर अध्यक्ष वरुण पाटील या दोघांनी डॉ राजु राम दांम्पत्य यांच्या पक्ष वाढीसाठी करत असलेल्या सामाजिक राजकीय कार्याचे कौतुक केले.  डॉ राजु राम दांम्पत्य आज पर्यंत भारतीय जनता पार्टी वाढीसाठी सतत प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठ राहून सतत पक्षाचे कार्य करत आहेत. भाजप पक्षाचे नेतेगण आणि आम्ही सर्वजण त्यांच्या भक्कम पणे राम दांम्पत्य यांच्या पाठीशी आहोत असे उद्गगार उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना म्हटले. यावेळी फोन वरुन माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी डॉ राजु राम यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.

सर्वच स्तरात या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे. यावेळी कार्यक्रमास उपस्थित भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, कार्यक्रम आयोजक ॲड. डॉ राजु राम, भाजप लीगल सेल जिल्हा संयोजिका ॲड. शिल्पा राम, जिल्हा उपाध्यक्ष संदिप सिंह, शहर सरचिटणीस रितेश फडके, पदाधिकारी सुनिल शेलार, राम बनसोडे, प्रदीप राम, रमेश शिंदे, छाया खामकर, ग्लोरी राम, शोभा ओंबळे, साधना राम, अजित चौहान, नमिता राम व पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरीक, महिलावर्ग कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

+