team jeevandeep 21/04/2025 sthanik-batmya Share
मुरबाड-प्रतिनिधी
मुरबाड शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील उभारलेल्या कमानीवर थोर निरूपणकार महाराष्ट्र भुषण तिर्थरूप डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असे नाव दिले होते.मात्र काही दिवसांनी धर्माधिकारी या नावातील काही अक्षरे बरेच दिवस झाले गळून पडली आहेत. याबाबत मुरबाड मधील नागरिकांनी तसेच बैठकी तील श्री सदस्यांनी अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाला सांगूनही मुरबाड नगरपंचायत प्रशासन कोणतीही दुरुस्तीची भुमिका घेत नसून दुर्लक्ष करीत आहे. नको त्या ठिकाणी लाखो रूपये नगरपंचायत खर्च करत असताना लाखो श्री सदस्यांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्र भुषण नाना साहेबांच्या नावा बाबत उदासिन आहे. मुरबाड नगरपंचायतच्या उदासिनते बाबत सर्वत्र नाराजी व्यक्त होत असून लवकरात लवकर हे नाव नव्याने लावावे अशी मागणी होत आहे.