Visitors: 390174
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

पुरात अडकलेल्या तिघांचा जीव वाचविण्या-या बाप लेकाचा कल्याण तहसीलदारांकडून सत्कार

  Thane jeevandeep       26/05/2025      sthanik-batmya    Share


आपती व्यवस्थापन चे काय?

WhatsApp Image 2025-05-26 at 8-20-46 PM 

कल्याण : उल्हास नदीस अचानक आलेल्या पुरामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले तिघे जण अडकले,परंतु स्वतः चा जीव धोक्यात घालून गाळेगावच्या बापलेकांनी होडितून जाऊन, त्यांचा जीव वाचवला ,या धाडसा बद्दल कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दोघांचा सत्कार ही केला. परंतु या निमित्तानं, आपत्ती व्यवस्थापन चे धिंडवडे निघाले त्याचे काय?

गाळेगाव मोहिली परिसरातील दत्तू मंगल्या गायकर, वय५५,शंकर गडल्या पाटील५५आणि सावळाराम गोप्या वाघे, वय६०वर्षे हे गुरे चारण्यासाठी नदीच्या परिसरात गेले होते, परंतु उल्हास नदीस अचानक आलेल्या पुरामुळे ते बेटावर च अडकले, त्यांनी आपली जनावरे कशीबशी तीरावर सुखरूपपणे पोहचवली. परंतु ते तेथेच अडकले, नदीच्या पुराच्या पाण्याने त्यांना चारही बाजूंनी घेरल्याने परिस्थिती गंभीर बनली.

यांना वाचवण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगोळे यांनी ही वार्ता कल्याण तहसील कार्यालयाला कळवली,कल्याण तहसील कार्यालयाला याबाबत माहिती मिळताच मंडळ अधिकारी,चेतन पष्टे, अग्निशामक अधिकारी  श्री तडवी हे महाशय घटनास्थळी पोहोचले खरे!पण पुराचा वेग इतका की कोणाचेही पाण्यात जाण्याचे धाडस होईना,अखेरीस गाळेगाव येथील  गुरुनाथ हनुमंत पवार, आणि त्यांचा मुलगा कु रोहन गुरुनाथ पवार यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालून स्वतःच्या होडीतून प्रंचड वेगानं वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात जाऊन गुरें चारण्यासाठी गेलेल्या तिघांचा जीव वाचवला.

 

त्यांचे हे काम नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, परंतु या निमित्तानं आपत्ती व्यवस्थापन बाबतीत काही प्रश्न उपस्थित होतात, आपले अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पुर्ण तयारी निशी गेले नव्हते का?आपल्या बोटी, रिस्क्यू टिम कुठे होती, जीव धोक्यात घालून पुरात उतरलेल्या दोघांना'लाईफजाँकेट, का दिली नाही?त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाले असते तर त्याला कोण जबाबदार?आपती व्यवस्थापन समितीच्या वेळोवेळी घेतलेल्या बैठका कशासाठी?त्याचा काय उपयोग?या सर्व प्रश्नाचे प्रशासनाकडे काय उत्तर आहे?निदान भविष्यात तरी अशा गंभीर चुका व्हायला नको याचा लोकप्रतिनिधी व शासनाने विचार करायला हवा.

+