Visitors: 391006
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

पुरवठा विभागाकडून अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरू !

  team jeevandeep      17/04/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड दि.१७- 

राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे यानुसार अन्न नागरी पुरवठा विभागातील निर्देशानुसार व ठाणे जिल्हा पुरवठा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मुरबाड तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरवठा निरीक्षण अधिकारी संयोगिता पवार यांच्या देखरेखीखाली तहसील विभागातील पुरवठा शाखेकडून अपात्र शिधापत्रिका  तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. 

तालुक्यातील अंतोदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी एक एप्रिल ते ३१ मे या कालावधीमध्ये शोध मिळून राबविण्यात येत आहे सदर शासन निर्णयान्वये  विहित केलेल्या  निकषाअंतर्गत या शोध मोहिमेत अंतोदय अन्य योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका धारकाकडून रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या माध्यमातून विविध नमुन्यात तपासणी अर्ज भरून प्राप्त केले जात असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी  संयोगिता पवार यांनी दिली आहे.

 दरम्यान गरजू व पात्र लाभार्थी लाभ मिळणे करता सदन लाभार्थींनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडून शासनाच्या मोहिमेत सहकार्य करावे असे आव्हान पुरवठा विभागाकडून करण्यात आले असून या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या रास्त भाव धान्य दुकानदार यांच्याकडील फार्म भरून माहिती सादर करावी व तसेच आवश्यक कागदपत्राची पूर्तता न केल्यास शिधापत्रिका रद्द केल्या जातील तसेच नागरिकांनी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न बाबत चुकीची अथवा खोटी माहिती दिली अस त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल व आवश्यक तिथे पोलीस विभागाची मदत घेतली जाणार असल्याची संयोगिता पवार यांनी म्हटले आहे.

+